आदिवासी वाडीवर झपाट्याने विकास कामे करणार – प्रितेश बाबेल
श्रीकांत शेलार
दांडगुरी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवर शनिवारी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रितेश बाबेल यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले.
प्रितेश बाबेल यांनी कार्ले येथे नुकतीच जागा घेऊन रिसॉर्ट बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र या बाबतीत त्यांना सर्व गोष्टी सहन कराव्या लागल्या मात्र आपण नियतीमध्ये काम करत असताना काही लोकांनी दिलेल्या त्रासाला प्रतिउत्तर न देता त्यांनी येथील सर्व ग्रामस्थांशी सलोखा निर्माण केला. गोरगरीबांच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे सुरवातीलाच जागा घेतल्या नंतर त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी कार्ले आदिवासी वाडी येथे सदिच्छ भेट देत येथील शालेय विद्यार्थी व शाळेतील शिक्षक यांच्याकडे संपर्क करून संवाद साधला व तेथे आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी काय हवं आहे हे जाणून घेत त्वरीत लागणाऱ्या वस्तु उपलब्ध करण्याचे वचन दिले. त्या अनुषंगाने शाळेत दोन संगणक, चार फॅन, पेन, पेन्सिल, वह्या व लागणाऱ्या शालोपयोगी वस्तू बाबेल यांच्याकडून देण्यात आल्या. तर मोठ काम म्हणजेच त्यांनी शाळेला नसलेली संरक्षक भिंत अंदाजे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात येणार असून हे सुद्धा दोन दिवसांत काम सुरू होणार असल्याने येथील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते.

अश्या अनेक विकासापासून वंचित असलेल्या आदिवासी समाजाकडे परिपूर्ण लक्ष देवून येथील आदिवासी बांधवांना सुजलाम सुफलाम करणार तर दहावी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर क्लासेस व करियर मार्गदर्शन शिबिर राबवून येथील मुलांना नोकरी सुध्दा मिळवून देणार असल्याचे समाजसेवक प्रितेश बाबेल यांनी सांगितले. तर वाडीवर सदिच्छा भेट देत समाजसेवेच्या भावनेतून खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी विशेष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणल्या. ग्रामीण भागाशी नाळ जुळलेल्या बाबेल यांनी आदिवासी वाडीवर विकासकामे करण्याचा मानस व्यक्त केला. परंतु या कार्ले हद्दीमध्ये अनेक धनदांडग्या व्यक्तींनी जागा खरेदी केल्या आहेत परंतु आदिवासी वाडीकडे कोणीही लक्ष दिले नाही. परंतु गेले दोन वर्षापूर्वी खरेदी केलेली जागा आणि आता त्या ठिकाणी होत असलेले विकासित काम हे होत असताना एक हात मदतीचा या भावनेतून बाबेल यांनी आदिवासी वाडीचा विकास करणार असल्याचे सांगितले. तर आदिवासी वाडीवर येणारे समाजसेवक प्रितेश बाबेल यांचे गाव अध्यक्ष शशिकांत पवार व सरपंच सुमती पवार यांनी यथोचित स्वागत केले. तर आदिवासी वाडी यांच्याकडून संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
