• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गॅस सिलिंडरचा पाईप पेटला; तीन भावंडे गंभीर जखमी

ByEditor

Dec 13, 2023

मिलिंद माने
महाड :
तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटून लागलेल्या आगीत तीन भावंडे भाजून गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. घरातील मोठा बहीणीचे कपडे पेटले असता तिचा वाचविण्यासाठी गेलेला तिचा भाऊ आणि लहान बहीण देखील भाजून खबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील पारवाडी या गावातील प्रज्ञा प्रकाश आमले (वय २६) हीने मंगळवार, दि. १२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जेवण बनविण्यासाठी गॅस पेटविला असता या गॅस सिलिंडरचा पाईप लिक होऊन पाईपने पेट घेतला. या प्रचंड ज्वाळांनी प्रज्ञाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तिला वाचविण्यासाठी धावलेला तिचा भाऊ रुपेश प्रकाश आमले (वय २४) याच्या कपड्यांनी देखील पेट घेतला. आपली दोन्ही भावांडे जळतांना पाहून घाबरलेल्या प्रिती प्रकाश आमले (वय २१) ही देखील त्यांना वाचवण्यासाठी धावली असता ति देखील भाजून गंभीर जखमी झाली. तिघांना ही तात्काळ न्यू लाईफ हॉस्पिटल महाड येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र पन्नास टक्के भाजलेल्या प्रज्ञा व रुपेश यांना पुढील उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटल मुंबई येथे हलविण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!