• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विहान म्हात्रे याची गणित संबोध परीक्षेत उत्तुंग भरारी

ByEditor

Dec 14, 2023

विनायक पाटील
पेण :
रायगड गणित अध्यापक मंडळाकडून रायगड जिल्ह्यातील इयत्ता पाचवीच्या मुलांची गणित संबोध परीक्षा दरवर्षी घेतली जाते. त्याचे निकाल लागले असून यावर्षीच्या निकालामध्ये जिल्ह्यातील सतरा मुलांनी 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यामध्ये पेण तालुक्यातील सात मुलांनी शंभर पैकी 100 गुण मिळवून यश संपादन केले आहे. त्यामध्ये पीएसएमएस इंग्लिश मीडियम स्कूल पेण येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी विहान विनोद म्हात्रे याच्यासह पेण तालुक्यातील अन्य शाळेमधील विद्यार्थी प्रथम शशिकांत पाटील, दिव्यांक हरिश्चंद्र बेकावडे, सानवी सचिन ढवळे, ज्ञानव गज, हर्षिता बर्गे, प्रथम पाटील, तन्मेष कडू , श्रुती नागरगोजे, गौतम वळवी यांचा समावेश आहे.

गणित संबोध परीक्षा 2023 च्या निकाल पत्रात रायगडच्या गुणवत्ता यादीत तालुक्यातील मुलांनी घवघवीत यश संपादन केल्याने तालुक्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचे वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!