• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका जखमी

ByEditor

Dec 14, 2023

मिलिंद माने
महाड :
तालुक्यातील चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एक नऊ वर्षीय बालिका जखमी झाली आहे. या जखमी बालिकेवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिंभावे गावामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून गुरुवारी सकाळी एका भटक्या कुत्र्याने खेळणाऱ्या लहान बालिकेवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ही बालिका जखमी झाली. तिला महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले असून या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आले आहेत. गेली महिनाभरामध्ये लहान मोठ्या सात जणांना चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती या जखमी बालिकेच्या नातेवाईकांनी दिली. यामुळे चिंभावे ग्रामस्थ भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत.

चिंभावे या ठिकाणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील या ठिकाणी या बालिकेवर उपचार न करता तेथून महाड येथे पाठवण्यात आल्याने चिंभावे प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी रेबीज प्रतिबंधात्मक लस आहे की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. अशा उपचाराकरिता २४ किलोमीटर प्रवास करून महाडला यावे लागत असेल तर या प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग काय? असा सवाल देखील करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!