• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

गॅलॅक्सी हॉस्पिटलतर्फे शिबिरात मोफत औषधे, रक्ताच्या तपासण्या व चष्मे वाटप

ByEditor

Dec 14, 2023

याआधी असे शिबिर कधीच झाले नव्हते -लक्ष्मी सुरवसे

विनायक पाटील
पेण :
गॅलेक्सी हॉस्पिटल व कल्याणकारी संस्था यांच्या विद्यमाने ग्रामपंचायत गोरठण बु. येथे आयोजित मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 170 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले. तसेच मोफत रक्ताच्या तपासण्या व मोफत चष्म्ये वाटप करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सरपंच किशोर पाटील, उपसरपंच रमेश पाटील, गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉ. रत्नदीप गवळी, राजेश टेलर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामिनी कल्याणकारी संस्था अध्यक्ष लक्ष्मी सुरवसे, ग्रामसेविका प्रतिमा खैरे, सदस्या शिल्पा झेमसे, प्रतिक्षा चव्हाण, माजी सरपंच सीताराम पाटिल, महेश पाटील, लक्ष्मण पाटील, सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र वावोशी डॉ. संदीप शिंदे, स्टाफ, ग्रामपंचायत गोरठण बु.।। डाटा ऑपरेटर आरोही कदम, कर्मचारी अर्चना पाटील,गणेश पाटील, CRP सुनिता पाटील,अरुण पाटील यांच्यासह उपाध्यक्ष, सचिव इतर मान्यवर उपस्थित होते.

बरेच शिबिर होतात पण गॅलेक्सी हॉस्पिटल ने जे शिबीर घेतले आहे असे शिबिर याआधी कधीच झालेले मी तरी पाहिले नाही या शिबिरामध्ये मोफत सर्व रक्त तपासण्या मोफत औषधे तसेच मोफत चष्मा वाटप करण्यात आले असल्याचे महिला परीक्षक लक्ष्मी सुरवसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी सामान्य तपासणी, मधुमेह, रक्त दाब तपासणी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, ताप, सर्दी, खोकला, रक्ताची कमी, श्वास घेण्यास त्रास होणे, स्त्री रोग तपासणी, अनियमीत मासिक पाळी, नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी, काचबिंदू तपासणी, रेटिना चेकअप, चष्म्याचा नंबर काढणे, इ.सी.जी., पी.सी.ओ.डी., पी.सी.ओ.एस. व इतर सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.

डॉ. शोविक घोष, डॉ. नयन ब्रम्हे, डॉ. सिद्धी घरत, डॉ. नैना जवाहरमलानी, डॉ. सिद्धांत पाटील, डॉ. रिचा मिरगल, डॉ. सुनिल कांबळे यांनी रुग्णाची तपासणी केली. तर सचिन पाटील ,सोनल पाटील, महेंद्र पिंगळे, प्रज्ञा थळे,दीक्षिता पारंगे, वर्षा जोशी, काजल दामले, साक्षी टेमकर, भावना म्हात्रे, पौर्णिमा, प्रीती, तेजस थळे, साहिल राजपुरे, संस्कार शिंदे, भक्ती लुभानिया, संध्या पाटील, व गॅलेक्सी हॉस्पिटल स्टाफ यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आयोजन व नियोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

“आपल्या येथे आरोग्य सेवेबाबत जनजागृती कमी प्रमाणात दिसत आहे. महिलांच्या काही समस्या असतील म्हणा किंवा हृदयविकाराच्या बाबतीत काय समस्या असतील तर त्यासाठी प्रत्येक वेळेस पेशंटला पनवेल, नवी मुंबई किंवा पुणे या ठिकाणी न्यावं लागतं. त्यात वेळ पैसा जातो. यासाठी आमचा मानस असा आहे की, गॅलेक्सी ग्रुप तर्फे आम्ही पेणमध्येच एक 100 बेडचा हॉस्पिटल सुरू करत आहोत. ज्याच्यामध्ये सर्व आरोग्य योजना आम्ही लागू करणार आहोत. त्याशिवाय मेडिक्लेमच्या कॅशलेस कंपन्या आहेत. त्यांच्या सुविधा उपलब्ध करणार आहोत. उद्देश एकच की पेण आणि पेण तालुक्याच्या आजूबाजूला जेवढे तालुके आहेत, गावं आहेत, रायगड जिल्ह्यातील जेवढा ग्रामीण भाग आहे या सर्वांना कमी दरामध्ये आरोग्य योजनेमार्फत मोफत आरोग्य सेवा देता यावा. हा उद्देश साध्य करण्यासाठी आजूबाजूला जवळपास 21 गावांमध्ये आम्ही कॅम्पच्या माध्यमातून जनजागृती करणार आहोत. त्यातलं हे गोरठण बु. हे तिसरं ठिकाण असून येथील ग्रामस्थांनी या शिबीराचा लाभ घ्यावा.” असे आवाहन डॉ. रत्नदीप गवळी यांनी गोरठण येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटक प्रसंगी बोलताना केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!