• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

करंजा बंदरात बोटीला आग; बोट जळून खाक

ByEditor

Dec 19, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील महत्वाचे मच्छिमार बंदर म्हणून नावलौकीक असलेल्या करंजा-नवापाडा येथिल बंदरावर उभ्या असलेल्या बोटीला मंगळवारी (दि. १९) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ही बोट पुर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे या आगीची झळ येथे उभ्या असलेल्या दुसऱ्या बोटींना बसली नाही.

जळालेली ही बोट अर्धवट बांधलेल्या अवस्थेत होती. दिपराज नाखवा यांच्या मालकीची ही बोट होती. बोटीचे बांधणी चालु असताना दिपराज नाखवा यांचे निधन झाल्यामुळे या बोटीची बांधणी थांबली होती. मंगळवारी बोटीवर काहीतरी काम सुरू असताना या बोटीने पेट घेतला. फायबरची बोट असल्यामुळे क्षणार्धात या आगीने बोटीला वेढले आणि त्या बोटीचा कोळसा झाला. अग्निशमन दलाने आणि स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले आणि या आगीची झळ बाजुला असलेल्या बोटींना बसू दिली नाही.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!