• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का; एक खासदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत?

ByEditor

Dec 23, 2023

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आणि ठाकरे गटात खळबळ उडवणारी बातमी पुढे आली आहे. उद्धव ठाकरे गटाला आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील खासदार भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आल्या असताना ठाकरे गटाचा एक खासदार सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटातील खासदार कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली भेट अत्यंत सकारात्मक झाली. मात्र डेलकर कुटुंब कार्यकर्त्यांशी संवाद साधून अंतिम निर्णय घेणार आहे. कलाबेन डेलकर यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो.

कलाबेन डेलकर स्व. खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आहेत. मोहन डेलकर यांनी २०२१ साली मुंबईतील नरिमन पाँईट येथील सी ग्रीन हॉटेल मध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती. स्थानिक प्रशासनाच्या जाचामुळे डेलकर यांनी आत्महत्या केल्याचा आरोप डेलकर कुटुंबीयांनी केला होता. मोहल डेलकर यांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakeray) यांनी उमेदवारी दिली होती.

दरम्यान, पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवला होता. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांच्या निवडणुकीचा प्रचार केला होता. या निवडणुकीमध्ये कलाबेन डेलकर यांनी विजय मिळवत महाराष्ट्राबाहेर निवडून येणाऱ्या पहिल्या शिवसेना खासदार ठरल्या होत्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!