• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागलोली येथे एसटीला अपघात

ByEditor

Dec 24, 2023

• चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
• दुचाकीस्वराला वाचविण्यासाठी चालकाचा जीव पणाला!

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथे दुचाकीला वाचविताना एसटीला अपघात झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने गाडीत प्रवाशी नसल्याने साईडपट्टीला एसटी उतरली असता कोणतेच नुकसान झाले नाही. मात्र, येथील अरूंद रस्त्यामुळे अपघात घडल्याचे कारण समोर येत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगूरी जवळील म्हसळा-धनगरमलई मार्गावर नागलोली मधलीवाडीच्या पुढे येताना एसटीचा तीव्र उतारावर दुचाकी वाचविण्यासाठी एसटी रस्त्याच्या कडेला उतरण्यात आली. यावेळी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. प्रसंगी एसटीत एकच प्रवाशी होता. त्यामुळे या अपघातात कोणतेच नुकसान झाल नाही.

दिघी ते बोर्लीपंचतन दांडगूरीमार्गे कसारकोंड ते श्रीवर्धन येथे जाणारी MH 20 BL 2474 चे चालक प्रविण बेरगल होते. सकाळी 12 वाजून 15 मिनिटांनी दिघीहून ही एसटी निघाली असताना नागलोली गावाच्या तीव्र उतारावर एसटीचा ब्रेक जागीच लागत नसल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने पुढील तीव्र उताराचे वळण न मारता सरळ बस रस्त्याच्या समोरील बाजूला असलेल्या चारित उतरवली. त्यामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचला. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

अरुंद रस्त्यामुळे एसटी अपघात
ग्रामीण भागातील रस्ते खराब असल्याने या भागात अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये आयुष्यमान संपत चाललेल्या गाड्या वापरल्या जात आहेत. त्यामुळे येथील प्रवास धोकादायक ठरत आहे.

खड्डेमय रस्ता, शिवाय दोन वाहने पास होऊ शकत नसलेला रस्ता. त्यामुळे दुचाकी वाचवायला जागा मिळाली नाही. एसटी खाली उतरली म्हणून आम्ही वाचलो.

-संतोष मोडसिंग, दुचाकीस्वार

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!