• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वेदांती लाड यांची नागोठणे रेल्वे स्थानकाच्या सल्लागार समितीवर निवड

ByEditor

Dec 26, 2023

किरण लाड
नागोठणे :
रेल्वे प्रशासन व प्रवासी यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून ज्या समितीकडे पाहिले जाते अशा महत्वाच्या तसेच निकडीच्या नागोठणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्य पदी नागोठणे येथील वेदांती लाड हिची निवड करण्यात आली आहे.

सर्वात जलद, किफायतशीर, सुरक्षित समजल्या जाणाऱ्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या असंख्य आहे. नागोठणे शहर हे मध्यवर्ती तसेच मुंबई शहराच्या जवळ असल्याने या रेल्वे स्थानकावरुन दररोज असंख्य प्रवाशी नोकरीनिमित्त, कामानिमीत्त प्रवास करीत असतात. अशा या मध्य रेल्वेच्या महत्वाच्या नागोठणे स्थानकात प्रवाशांना विविध समस्यांना दररोज तोंड द्यावे लागते. अशा या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी, त्या मांडण्यासाठी शासनाने सल्लागार समिती नेमली आहे. या समितीवर शासन येथील विभागातील लोकांची निवड करीत असते. या समितीची मिटिंग दर महिन्याला किंवा तीन महिन्यानी मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयात होणार आहे. अशा या मध्य रेल्वेच्या नागोठणे रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्यपदी नागोठणे, मराठाआळी येथील उच्चशिक्षित वेदांती आनंद लाड हिची निवड करण्यात आली आहे. तसे पत्र मध्य रेल्वेचे मुंबई येथील वरिष्ठ विभागिय व्यवस्थापक जितेंद्र यादव यांनी दिले आहे.

वेदांती लाड या भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड यांच्या कन्या असून त्या धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्यां म्हणून विभागात ओळखल्या जातात. त्यांच्या निवडीचा कालावधी एक वर्षाचा असला तरी त्या आपल्या कर्तृत्ववाने रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांना नक्कीच वाचा फोडून प्रवाशांना न्याय देतील अशी आशा प्रवाशी वर्गातून व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत नागोठणे विभागातील सर्व स्तरातून विशेषतः महिला वर्गातून होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!