• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या शेतजमिनीवर डेब्रिजचा भराव; महसूल, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

ByEditor

Dec 26, 2023

अनंत नारंगीकर
उरण :
शासकीय नियमांची पायमल्ली करून विकासकांनी व भांडवलदारांनी उरण तालुक्यातील शेतजमिनीवर डेब्रिजचा भराव टाकण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. रात्री अपरात्री सुरु असलेल्या डेब्रिजच्या भरावाकडे महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे भरधाव वेगात डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या डंपरला रात्री अपरात्री अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी महसूल, पोलीस यंत्रणेने सदर अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनमाणसा कडून करण्यात येत आहे.

जेएनपीए बंदर, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि शिवडी-न्हावा सी लिंक या दोन महत्त्वाच्या प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील शेतजमिनीना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे काही भांडवलदारांनी, व्यवसायिकांनी शासनाच्या डोळ्यात धुळफेक करुन आपआपला काळा पैसा व्हाईट करण्यासाठी आपला मोर्चा हा उरण तालुक्यात वळविला आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करून विकासकांनी व भांडवलदारांनी तालुक्यातील शेतजमिनी खरेदी किंवा भाडेतत्त्वावर घेऊन सदर शेतजमीनीत डेब्रिजचा भराव टाकण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. रात्री अपरात्री सुरु असलेल्या डेब्रिजच्या भरावाकडे महसूल विभाग, वन विभाग आणि पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत असून भरधाव वेगात डेब्रिजची वाहतूक करणाऱ्या डंपरला रात्री अपरात्री अपघात झाला तर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. तरी महसूल, पोलीस यंत्रणेने सदर अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!