• Sat. Apr 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

१ जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप

ByEditor

Dec 31, 2023

पुणे : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एक जानेवारी २०२४ पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने बेमुदत संप पुकारला आहे. या बंदमध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील संपावर असणार आहेत. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.

राज्यात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय्य हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका महासंघाकडून करण्यात आली. आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली गेली नाही. महासंघाच्या निवेदनाची दखल घेत सरकारने सचिवांच्या अध्यक्षतेखाली हिवाळी अधिवेशन काळात नागपूरला पदाधिका-यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासने देण्यात आल्याचेही महासंघाकडून सांगितले.

सरकारकडून कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्या वतीने नाइलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने एक जानेवारीपासून पुकारलेल्या संपात सहभाग होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?

विविध प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनने पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये आता अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने उडी घेतली आहे. त्यामुळे एक जानेवारीपासून राज्यातील सर्वच रेशन दुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत. रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, टू जी ऐवजी फोर जी मशिन द्या, कालबा नियम बदला, यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील रेशन दुकानदार संपावर जाणार असल्याचे पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!