• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व औरंगाबाद अटो अन्सलारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कायम कामगारांचा करार संपन्न

ByEditor

Dec 26, 2023

आमदार सचिन अहिर, गोविंदराव मोहिते व राजनभाई लाड यांचे कामगारांनी मानले आभार

विनायक पाटील
पेण :
आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरचिटणीस गोविंदराव मोहिते व संघटनेचे उपाध्यक्ष व कामगार नेते राजनभाई लाड यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व औरंगाबाद अटो अन्सलारी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कायम कामगारांचा करार संपन्न झाला. या कराराचा कालावधी ऑगस्ट 2023 ते 31 जानेवारी 2027 पर्यंत राहणार असून कामगारांच्या पगार वाढीमध्ये 10,500 रुपयांची वाढ करण्यात आली असून DA ची मागील फरकाची थकीत रक्कम 17,500 प्रत्येकी कामगार + बोनस 15000 + एरीयस थकीत रक्कम 50,400 देण्यात येणार असल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

या सर्व कामगारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच कामगार संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन आहिर, संघटनेचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, संघटनेचे उपाध्यक्ष राजनभाई लाड, राज्यसचिव सादिक आर भाई खान, औरंगाबाद विभागीय सचिव अशोक निकम, सहसचिव जयराम, व्यवस्थापक मनोज बजाज, प्लांट हेड एस. आर. मुळे, मॅनेजर जोशी व कामगार प्रतिनिधी दत्तात्रय पवार, संजय पवार, नारखेडे, योगेश बोरसे, किशोर पारधे व इतर कामगार संघटनेचे प्रतिनिधी या सर्वांचे आभार मानले.

कायमस्वरूपी काम व पगारवाढ मिळाल्याने कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून याचा फायदा कंपनीलाही होणार असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष व कामगार नेते राजनभाई लाड यांनी बोलताना सांगितले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!