• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागपुरमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट; ९ जणांचा मृत्यू

ByEditor

Dec 17, 2023

नागपूर : नागपुरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर, ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत.

एएनआयने सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, “नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला.” या कंपनीत संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार केली जातात, अशी माहिती आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणावर दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते.

युवराज चोराडे, ओमेश्वर मछिर्के, मिता उईके, आरती सहारे, श्वेताली मारबते, भाग्यश्री लोणारे, रुमीता विलास उईके, मोसम पटले अशी या स्फोटात मरण पाललेल्या मृतांची नावे आहेत.

या घटनेवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नागपुरातील सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटात ६ महिलांसह ९ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे. नागपूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून स्वतः आयजी, एसपी, जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे.”

दरम्यान, कंपनीत सकाळी ९ वाजता स्फोट झाल्याचे आम्हाला कळलं. आता कंपनीत कुणीही कर्मचारी नाही. सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे वरिष्ठ जनरल मॅनेजर आशिष श्रीवास्तव यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!