• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोह्यात नेत्रतपासणी शिबिरात १६१ जणांची तपासणी; ६७ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ByEditor

Jan 1, 2024

शशिकांत मोरे
धाटाव :
रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६७ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. रोहा सिटिझन फोरमने गेल्या दीड वर्षभरात ९८२ नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे.

या शिबिरातील उर्वरित १३ नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया मंगळवारी दोन टप्प्यात करण्यात येणार आहेत. शिबिरात अल्पदरात चष्मे वाटपही करण्यात आले. रोहा सिटिझन फोरम सातत्याने ‘अंधत्वाकडून दृष्टीकडे’ हे मोतीबिंदूमुक्त रोहा अभियान राबवत आहे. रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट मार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते व तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केली जात असल्याने गरजूंना दिलासा मिळत आहे. रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या मंदिर सभागृहात शिबीर संपन्न झाले. आजच्या शिबिरातिल एकूण ५४ रुग्णांची आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.

शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ अश्विन पवार, नियती शिंदे, सिद्धी मोरे, समृद्धी उतेकर, प्रविण पाटील, सागर पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली. रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख, मिलिंद अष्टिवकर, महेश सरदार, संदीप सरफळे, श्रीकांत ओक, इल्यास डबीर, दिनेश जाधव, अमोल देशमुख, प्रशांत देशमुख, अहमद दर्जी, उस्मान रोहेकर, परशुराम चव्हाण, राजेश काफरे, निलेश शिर्के, शैलेश रावकर, सिद्धेश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, रिद्धी बोथरे, बिलाल मोरबेकर आदींनी परिश्रम घेतले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!