• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

९५ वर्ष वयोमानाची म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय इमारत बनतेय धोकादायक!

ByEditor

Jan 1, 2024

प्रशासनाच्या बहुतांश विभागात रिक्तपदांचे प्रमाण वाढले
गतिमान प्रशासनाला लागली खीळ, सर्वसामान्यांचा नाराजीचा सूर

वैभव कळस
म्हसळा :
येथील मुख्य प्रशासकीय इमारत म्हणजे तहसील कार्यालय (महसुलचे सर्व विभाग), पोलीस स्टेशन, परिक्षेत्र वन अधिकारी या तीनही कार्यालयाची इमारत धोकादायक आहे. हि इमारत किमान ९५ वर्ष जुनी आहे. तालुक्यातील अनेक महत्वाची पदे रिक्त असताना गतिमान प्रशासनाला खीळ लागल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद आणि बॅ. अ. र. अंतुले पंचायत समिती प्रशासकिय भवनमध्ये सुद्धा सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत.

गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गटशिक्षण अधिकारी या मुख्य पदांसह इतर ५० ते ६० टक्के पदे रिक्त आहेत. महसुल विभागातील नायब तहसीलदार निवडणूक, महसुल अव्वल कारकून ३ पदे रिक्त, महसुल सहाय्यक ३ पदे रिक्त, तलाठी १० पदे तर कोतवाल १३ पदे रिक्त आहेत. याच इमारतीत असलेल्या वन विभागाचे परिक्षेत्र वनआधिकारी ह्यांच्याकडे श्रीवर्धनचा अतिरिक्त कार्यभार आहे तर वनरक्षक ६ पदे आणि १ लिपिक पद रिक्त आहे. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक १ पद रिक्त, १ पोसई आणि अन्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे बहुतांश कार्यालयातून मोठ्या प्रमाणांत नागरिकांच्या कामांना विलंब होत आहे.

आंबेत, तोराडी ,संदेरी, कोंझरी, तळवडे या भागातून येणऱ्या नागरिकांना एकदा येण्यासाठी किमान ३०० रुपये खर्च येतो. त्यामुळे एका फेरीत काम होत नसल्याने या नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. दिवसेंदिवस मुख्य प्रशासकीय इमारतसुद्धा धोकादायक होत आहे. पाहिल्या मजल्यावर जास्त वर्दळीचे म्हणजे पुरवठा, कुळकायदा, संजय गांधी, निवडणूक, MREGS, रोजगार हमी योजना ही कार्यालये आहेत. नागरिकांना त्रासदायक ठरू नये म्हणून ईमारतीच्या पहिल्या मजल्याचा वापर करू नये आशा सूचना तहसीलदार म्हसळा यांना देण्यात आल्या आहेत, मात्र त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. सद्यस्थितीत सदर इमारतीत व परीसरांत तहसील कार्यालय (महसुलचे सर्व विभाग), पोलीस स्टेशन, परिक्षेत्र वन अधिकारी, उप- कोषागार, सेतू, मंडळ व तलाठी कार्यालय आहेत. ह्या सर्व कार्यालयातून रोजच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने इमारतीचा वापरही वाढला आहे. त्यातच इमारत दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!