• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेवदंडा मोठे बंदर येथे गैरसमजुतीतून मारहाण : दोन जखमी

ByEditor

Jan 1, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
तालुक्यातील रेवदंडा मोठे बंदर येथे गैरसमजुतीतून मनोज मारकु, अभय मारकु, अभि हले, प्रियांका हले, रंजीता मारकु (रा. रेवदंडा मोठेबंदर, ता. अलिबाग) या पाच जणांनी मारहाण केल्या प्रकरणी अब्दुल हसन शेख (रा. रेवदंडा मोठेबंदर,ता. अलिबाग) यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील मौजे मोठे बंदर येथे असणाऱ्या प्रगती हॉटेलच्या मागे अलिबाग येथे दिनांक 31/12/2023 रोजी 11:30 वा.च्या सुमारास मौजे रेवदंडा मोठे बंदर प्रगती हॉटेलच्या मागे अब्दुल हसन शेख रा. रेवदंडा हे त्यांची आत्या हिला तिची मुलगी हिच्या बद्दल समजावुन सांगत असतांना अब्दुल शेख हे यांतील आरोपीत अभय मारकु यांच्या बद्दल बोलत आहे असा गैरसमज करून घेवुन मनोज मारकु, अभय मारकु, अभि हले, प्रियांका हले, रंजीता मारकु या पाच जणांनी फिर्यादी अब्दुल हसन शेख व त्याची आई व जखमी आत्या यांना शिविगाळ करून हाताबुक्याने मारहाण केली. त्यावेळी आरोपीत अभि हले यांनी त्याचे हातातील लोखंडी पाईपने फिर्यादी यांचे दोन्ही पायावर झोडी मारल्या आणि आरोपीत मारकु याने त्यांचे हातातील लाकडी काठीने फिर्यादीचे डोक्यात व पाठीत झोडी मारून दुखापत केली. तसेच आरोपीत रंजीता मारकु हिने फिर्यादी यांची आत्या हिच्या कानातील कुडी ओढल्यामुळे तिच्या कानातुन रक्त येवुन दुखापत झाली व सदरची सोन्याची कुडी कोठेतरी पडुन गहाळ झाली.

याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.207/2023 भा.दं.वि.क.326,143,147,323, 504,506,427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उप निरीक्षक शिवकुमार नंदगावे हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!