• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडातल्या प्रमुख गद्दारांना पायउतार करेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही -स्नेहल जगताप

ByEditor

Jan 11, 2024

मिलिंद माने
महाड :
सुप्रीम कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवून पक्षपाती निर्णय दिल्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाडमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आज महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. या वेळेला मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक हातात काळे झेंडे घेऊन उपस्थित होते.

शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढाईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवून पक्षपाती निर्णय दिला असून शिवसेना ही बाळासाहेबांची व उद्धव ठाकरेंचीच आहे असे प्रतिपादन महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी करून गद्दारांच्या कपाळी जो गद्दारीचा लागलेला डाग आहे तो कधीही नष्ट होणार नाही तसेच रायगडच्या मातीत असणाऱ्या प्रमुख गद्दारांना जोपर्यंत पायउतार करीत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे सांगून स्नेहल जगताप यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पक्षपाती निर्णयाबद्दल निषेध व्यक्त केला. यावेळी महाड तालुक्याच्या ग्रामीण भागातून व शहरातून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!