• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अखेर उद्या उरण रेल्वे सुरू होणार!

ByEditor

Jan 11, 2024

घन:श्याम कडू
उरण :
गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. अखेर मुहूर्त मिळाला असून, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. गेली दोन तीन दिवसांपासून चाचपणी सुरू आहे.

गेली २५ ते ३० वर्षांपासून उरण रेल्वे सुरू होईल या आशेवर उरणकर होते. परंतु प्रत्येकवेळी उरणकरांचा भ्रमनिरास होत होता. मात्र प्रदीर्घ काळानंतर उरण रेल्वे सेवेला मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न्हावा शिवडी अटल सेतूचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने उरण नेरुळ रेल्वे सेवेचाही शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. सदर उद्घाटन रिमोटद्वारे होईल. यामुळे उरणकरांना कमी वेळात मुंबईला जाणे शक्य होणार आहे. उरण रेल्वे उद्या सुरू होणार असल्याने उरणकरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. सुरुवातीला बेलापूर, नेरुळ आदी ठिकाणी फेऱ्या सुरु होणार आहेत. त्यानंतर फेऱ्यांमध्ये वाढ होइल असे रेल्वेच्या सूत्रांकडून समजते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!