• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावजवळ कोकण रेल्वेखाली एकाची आत्महत्या!

ByEditor

Jan 11, 2024

सलीम शेख
माणगाव :
माणगाव जवळील कुरवडे गावच्या हद्दीत कोकण रेल्वेच्याखाली रेल्वे ट्रॅकवर इलेक्ट्रिक पोल क्र, ३९/१६ ते ३८/१८ च्या दरम्यान एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. १० जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची खबर प्रतीक दामोदर मेश्राम रा. वरसगाव-कोलाड ता. रोहा यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर घटनेबाबत गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत इसम सुरेश तुकाराम चेरफळे (वय-६३) रा. उणेगाव ता. माणगाव यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून रेल्वे ट्रॅकवर इलेक्ट्रिक पोल क्र, ३९/१६ ते ३८/१८ च्या दरम्यान मुंबई बाजूकडून गोवा बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या अथवा मालगाडीच्या खाली झोपून आत्महत्या केली. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. नं. १ /२०२४ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सानप हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!