• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्ली पंचतन येथे आयोध्या राम मंदिरातील अक्षतांची मंगल कलश यात्रा संपन्न

ByEditor

Jan 15, 2024

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
अयोध्येमध्ये भुतो न भविष्यती असा अतिभव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. याला अजूनकाही दिवसांचा अवधी असला तरी देशभरात आतापासूनच वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. या निमित्ताने श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या माध्यमातून अक्षता कलश यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बोर्ली पंचतन येथील हिंदू लहान थोर बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर या यात्रेमध्ये राम लक्ष्मण सीता व्यक्तिरेखा साकारल्या होत्या.

अयोध्येमध्ये नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असून २२ जानेवारीला हे मंदिर खुले होणार आहे. या दिवशी रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून संपूर्ण देशभरातच यानिमित्ताने संपूर्ण तालुक्यामध्ये अक्षता कलश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे यामध्ये बोर्ली पंचतन येथील सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने श्री हनुमान मंदिर येथून यात्रेची सुरुवात झाली तर गणेश चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, एस टी स्टँड व परत श्री हनुमान मंदिर अशी कलश यात्रा आयोजित करणयात आली यामध्ये प्रभू श्रीरामाचा जयघोष करण्यात आला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!