• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बोर्ली पंचतन येथील शिक्षिका मंजिरी दिवेकर आदर्श गुरुजन पुरस्काराने सन्मानित

ByEditor

Jan 16, 2024

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे श्री मोहनलाल सोनी विद्यालय येथे सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या मंजिरी उत्तम दिवेकर यांना राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण परिषदे मार्फत राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण परिषद यांचे वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श गुरुजन पुरस्काराचे वितरण नेरुळ नवी मुंबई येथील गुरुवर्य बाळाराम पाटील विद्यालय येथे करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाजकार्याची प्रेरणा घेत सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात जनसेवेचा वसा हाती घेत शैक्षणिक कार्य प्रखरतेने करीत विद्यार्थी हेच दैवत मानीत त्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श गुरुजन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील श्री मोहनलाल सोनी विद्यालय येथे कार्यरत असणाऱ्या मंजिरी उत्तम दिवेकर यांना देखील आदर्श गुरुजन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील अभिजित सुरळकर, सुभाष सुर्वे, शेख मोहम्मद हनिफ यांना देखील गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मंजिरी दिवेकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!