• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव तालुका आरोग्य अधिकारी पदी डॉ. भारसाखळे

ByEditor

Jun 24, 2023

सलीम शेख
माणगाव :
तालुका आरोग्य अधिकारी गोपाळप्रसाद परदेशी हे निवृत्त झाल्यामुळे त्या रिक्त पदावर निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीम भारसाखळे यांची माणगाव तालुका आरोग्य अधिकारी पदी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या आदेशाने नियुक्ती केली आहे.

डॉ. गोपाळप्रसाद परदेशी तालुका आरोग्य अधिकारी हे ३१ मे २०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त होते. त्या पदावर निजामपूर प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीम भारसाखळे यांची नियुक्ती केली असून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. डॉ. भारसाखळे यांनी चेंबूर येथे बीएमसी महानगरपालिका रुग्णालय तसेच नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले. तसेच चेंबूर येथे बीएमसी महानगरपालिका रुग्णालयात कोविड काळात अहोरात्र रुग्णांची सेवा करून उल्लेखनीय काम केले.

निजामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रुग्णांना गेले अनेक दिवस चांगली सेवा दिली. तसेच शासनाचे विविध उपक्रम राबविले आहेत. तेथील कर्मचारी, आरोग्यसेवक व आरोग्यसेविका यांना मार्गदर्शन व सहकार्य करीत त्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेत सौजन्याने वागणूक दिली. त्यामुळे ते अल्पावधीत लोकप्रिय वैद्यकीय अधिकारी म्हणून परिचित झाले. डॉ. भारसाखळे यांची तालुका आरोग्य अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबाद्दल निजामपूर प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण आरसाळे, हिवताप विभाग आरोग्य पर्यवेक्षक राजेंद्र मंडपे, हिवताप विभाग तांत्रिक पर्यवेक्षक राजेंद्र पाटील, रायगड जिल्हा हिवताप संघटना आरोग्य सेवक तथा सरचिटणीस राजेंद्र खाडे, आरोग्य सेवक जिल्हा संघटक सुनिल मोरे, माणगाव शहर आरोग्य सेवक भगवान कदम, तालुका आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक संजय राऊत, लेखापाल विनोद सावळ तसेच कमर्चारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!