• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

८ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ४० वर्षीय नराधमाने केला अत्याचार; आरोपी अटकेत

ByEditor

Jan 31, 2024

दिघी येथील घटना; परिसरात संताप

वार्ताहर
बोर्ली पंचतन :
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी कोळीवाडा येथील निरागस ८ वर्षीय बालिकेवर येथीलच ४० वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात ४० वर्षीय इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिघी कोळीवाडा येथील ८ वर्षीय बालिकेच्या निरागसतेचा फायदा घेत 30 जानेवारी रोजी रात्री 7:30 ते 9 वाजण्याच्या सुमारास येथीलच जयपाल महादेव भणगोजी या ४० वर्षीय इसमाने तिला जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली. याविरोधात बालिकेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल दिली असून दिघी सागरी पोलीस ठाण्यामध्ये जयपाल भणगोजी याचे विरोधात गु. र. न. 8-2024 भादवि कलम 376 (2), जे 376 (3), 376 (अब), 363, भादवि सं. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 (क), कलम 4,6,8 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे तर आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!