• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

भाजपमध्ये इनकमिंग सुरुच! नागोठण्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ByEditor

Feb 3, 2024

किरण लाड
नागोठणे :
काही दिवसांपूर्वी येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा प्रस्थापितांना धक्का असतानाच नागोठणे तसेच विभागातील विविध पक्षातील मान्यवर कार्यकर्त्यांनी भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष, माजी आमदार‌ धैर्यशील पाटील यांच्या कल्पक व शांत नेतृत्व तसेच पेण, सुधागड मतदार संघाचे अध्यक्ष युवा नेते प्रसाद भोईर यांच्या कार्यपध्दतीवर प्रभावित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

या पक्षप्रवेशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रोजगार व स्वंयरोजगार रायगड जिल्हा संघटक प्रल्हाद पारंगे, मनसेचे नागोठणे शहर उपप्रमुख व मराठी उद्योजक पवन जगताप, नुकतीच वाॅर्ड क्रं. 1 मधून नागोठणे ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणारे ॲड. रमेश जाधव, प्रसिद्ध सिव्हिल इंजिनिअर चंदन मोरे, केएमजी विभागातील सामाजिक कार्यकर्ते, मराठी उद्योजक गणेश घाग, नागोठणे कोळी समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते, मराठी उद्योजक सुदर्शन कोटकर, पत्रकार सचिन नेरपगार अशा विविध पक्षातील आणि क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवरांनी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश केला.

दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष, माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे सयंमी तसेच कल्पक नेतृत्व तसेच पेण, सुधागड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष, युवा नेते प्रसाद भोईर यांच्या तत्पर कामाच्या शैलीवर प्रभावित होऊन तसेच ते नक्कीच या विभागाचा विकास करतील ही खात्री असल्याने आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करित आहोत असे प्रवेशकर्त्यांनी बोलताना सांगितले. या पक्षप्रवेशावेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांबेकर, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, रोहा तालुका सरचिटणीस एकनाथ ठाकूर, भाजपा रोहा तालुका चिटणीस अनिल पवार, रोहा तालुका क्रिडा संयोजक शेखर गोळे, रोहा तालुका महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष अपर्णा सुटे, रोहा तालुका शिक्षण सेलचे अध्यक्ष अशोक अहिरे, उपाध्यक्ष धनराज उमाळे, ओबीसी रोहा तालुका अध्यक्ष अंकुश सुटे, माजी तालुका उपाध्यक्ष विठोबा माळी, माजी विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, मराठी उद्योजक सुदेश येरुणकर, मकरंद गडकरी आदी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागोठणे तसेच विभागातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश‌ करण्याचा ओघ वाढत असून हा प्रस्थापितांना धक्का असून आगामी काळात नागोठणे शहर व‌ विभागातील असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी जोरदार चर्चा सुरु आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!