• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अनधिकृत डिझेल चोरी प्रकरणी अजुनही सहा आरोपी फरार

ByEditor

Feb 4, 2024

विनायक पाटील
पेण :
तालुक्यातील तरणखोप परिसरात 2 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा डिझेल चोरीचा मुद्देमाल पकडण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले. या प्रकरणातील नऊ पैकी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असुन अजुनही सहा आरोपी पेण पोलिसांच्या हाती न लागल्याने ते फरार असल्याचे सिद्ध होत आहे. मात्र, त्याबाबत पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांना विचारले असता सदर सहा आरोपींचा तपास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

पेण तालुक्याला लागुन असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचे अनेक वेळा ऐकावयास मिळाले आहे. मात्र काही दिवसांपुर्वी पकडलेल्या कोट्यावधी रुपयांच्या डिझेलमुळे ही अवैध धंद्याची चर्चा नसुन प्रत्यक्षात हे मोठ्या प्रमाणावर धंदे होत आहेत हे सिद्ध झाले आहे. 2 जानेवारी रोजी तरणखोप येथे पकण्यात आलेल्या डिझेल चोरीच्या कारवाईत पोलिसांनी जहीर अहमद लब्बे, महम्मद अली अब्दुल वहाब आणि महम्मद रियाज महम्मद इदरिस अन्सारी या तिघांना ताब्यात घेतले आहे. तर इशतीयाक (पुर्ण नाव माहीत नाही), राजू पंडीत (पुर्ण नाव माहीत नाही), उस्मान (पुर्ण नाव माहीत नाही), टँकर क्रमांक एमएच 04 जी एफ 8017 चे मालक, टँकर क्रमांक एमएच 04 जीएफ 8017 चा ट्रान्सपोर्टर आणि अब्दुल शेख हे सहा जण अजुनही फरार असल्याची महिती पेण पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपींवर पेण पोलिस ठाण्यात कलम 420 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3,7,8 सह मोटार स्पिरीट अँड हाय स्पीड डिझेल ऑर्डर 2005 मधील कलम 2(ए), 2 (ई), 2 ( एफ), 2 (जी), 2 (टी), 3, 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!