• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शुभमसिंग राघव यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेला अटक

ByEditor

Feb 14, 2024

घनःश्याम कडू
उरण :
फिर्यादीचे पती शुभमसिंग शुभाषसिंग राघव (29) यांना ओळखीच्या महिलेने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

शुभमसिंग राघव यांचे उरणमधील एका महिलेशी ओळख असल्याने त्यांचे तिच्या घरी नेहमीच येणे जाणे होते. याचा गैरफायदा उठवीत माझे सोबत लग्न कर व पत्नीस घटस्फोट दे असे वारंवार बोलून मानसिक त्रास दिल्याने शुभमसिंग राघव यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच त्यांनी 31 जानेवारी 2024 रोजी आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला आहे.

याप्रकरणी फिर्यादीने उरण पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील महिलेला पोलिसांनी अटक केली असून तिच्यावर 24/2024 भादवी कलम 306 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आर. सी. घनवट हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!