संतोष रांजणकर
मुरूड : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक जिव्हाळ्याचे सण बकरी ईद व आषाढी एकादशी गुरुवार, दि. २९ जून रोजी साजरी होत असून सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुरुड शहरात पोलीसांचे संचलन घेण्यात आले.
मुरुड पोलीस ठाणे हद्दीत आगामी येणारे आषाढी एकादशी व बकरी ईद सणाचे अनुषंगाने मुरुड पुरकर नाका, बाजारपेठ चौक-आझाद चौक-मुरुड बाजारपेठ-हनुमान हॉटेल-मुरुड कोळीवाडा-मुरुड फुटणकर नाका-मुरुड बीच-मारुती नाका-गणेश आळी-मुरुड नगरपालिका-रीक्षा स्टॅंडपर्यंत रुट मार्च काढण्यात आला. सदर रुट मार्च सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक मंडलिक व श्रेणी पोलीस उपनिरिक्षक माने मुरुड पोलिस ठाणे हद्दीत रूट मार्च व मॉकड्रील घेण्यात आले. पोलीस ठाणेकडील २ अधिकारी, १० अंमलदार, ८ होमगार्ड व ३० आरसीपी प्लाटून (वडखळ) या संचलनात सहभागी झाले होते.