• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागोठण्यात पोलीसांचा ‘रूट मार्च’

ByEditor

Jun 26, 2023

महेंद्र म्हात्रे
नागोठणे :
आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित रहावी यासाठी नागोठणे शहरात पोलीसांनी आज सोमवार दि. २६ रोजी पथ संचलन केले.

नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक नारायण चव्हाण, हे. कॉ. विनोद पाटील, पोलीस नाईक संतोष म्हात्रे यांच्यासह 12 अंमलदार सहभागी झाले होते. नागोठणे पोलीस ठाण्यापासून संचलनास सुरवात होऊन मिश्र वस्ती, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठ, गांधी चौक, मोहल्ला असे पथसंचलन घेण्यात आले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!