• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण तालुक्यात होतेय मोरांची शिकार!

ByEditor

Feb 15, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
उरण, पनवेल तालुक्यातील दिघाटी, केळवणे, साई, पुनाडे, वशेणी, चिरनेर, रानसई, विंधणे, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, आवरे, कोप्रोली, कळंबुसरे, केगाव, जेएनपीए बंदर परिसरात मोठ्या प्रमाणात मोर पक्षी आढळून येत आहेत. मात्र काही वर्षांपासून मोर या पक्षांची शिकार होत असल्याने मोरांची संख्या कमी होत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरी या राष्ट्रीय पक्षाचे जतन करण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत पक्षी प्रेमी व्यक्त करत आहेत.

मोर हा मोठ्या आकाराचा पक्षी आहे, यात नराची लांबी १००–११५ सेंमी (३९–४५ इंच) आणि पूर्ण वाढ झालेल्या पिसाऱ्याच्या शेवटी १९५–२२५ सेंमी (७७–८९ इंच) इतकी असते. तर वजन ४–६ किलो (८.८–१३ पौंड) पर्यंत असते. लांडोर म्हणजेच मादी, सुमारे ९५ सेंमी (३७ इंच) लांबीच्या असतात आणि वजन २.७५–४ किलो (६.१–८.८ पौंड) पर्यंत असते. मोर हा राष्ट्रीय पक्षी असून तो उरण, पनवेल तालुक्यातील अनेक डोंगर परिसरात आढळून येत आहे. मात्र, वारंवार लागणाऱ्या वणव्यामुळे, माती उत्खनन आणि शिकारीमुळे मोर पक्षाचे अस्तित्व धोक्यात येत असून त्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोरांचे जतन करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी पक्षी प्रेमी व्यक्त करत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!