रिलायन्सच्या मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार
किरण लाड
नागोठणे : महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे यावे,त्यांचे सक्षमीकरण, सबलीकरण व्हावे, या उदात्त हेतूने भारतीय जनता पक्षाचे पेण, सुधागड, रोहा मतदार संघाचे प्रमुख, युवकांचे आधारस्तंभ प्रसाद भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महिलांसाठी भव्य कबड्डी स्पर्धेचे तसेच नमो चषकाचे आयोजन रिलायन्स, नागोठणेच्या मैदानावर करण्यात आले आहे.
महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये, त्यांचे उदात्तीकरण व्हावे हा मुळ उद्देश घेऊन प्रसाद भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन रविवार, दि.18 फेब्रुवारी रोजी रिलायन्स टाऊनशिपच्या मैदानावर करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे एक ते चार क्रमांकाच्या भरघोस बक्षिसांबरोबर, खास आकर्षक “नमो चषक” देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पक्कड व पब्लिक हिरो अशी वैयक्तीक बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या नियमावलीत खेळविण्यात येणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला संघाकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. अशा महिलांसाठी आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कबड्डी स्पर्धा रिलायन्स टाउनशिपच्या मैदानावर रविवार दि. 18 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4 वाजता सुरु होतील असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
प्रसाददादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या महिला कबड्डी स्पर्धेचा अंतिम विजेता तसेच “नमो चषका”चा मानकरी कोण होईल? याची उत्सुकता कबड्डी रसिकांना लागून राहिली आहे.