• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावात स्वस्तात सिटीस्कॅन मशीन देतो सांगत डॉक्टरची ४ लाखाची फसवणूक

ByEditor

Feb 16, 2024

सलीम शेख
माणगाव :
स्वस्तात सिटीस्कॅन मशीन देतो असे सांगत डॉक्टरची ४ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि. २ एप्रिल २०२३ ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान खांदाड-माणगाव येथे फिर्यादी यांच्या राहत्या घरात घडली. याबाबतची फिर्याद डॉ . इस्माईल हुसेन रहाटविलकर (वय ४०) रा. तनिज पॅलेस अल्फा हॉस्पिटलजवळ मोरबा रोड, खांदाड-माणगाव यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील आरोपी मोहम्मद कासीम सैफी रा. गाझियाबाद उत्तरप्रदेश यांनी फिर्यादी डॉ. इस्माईल हुसेन रहाटविलकर यांना सिटीस्कॅन मशीन स्वस्तात देतो असे सांगून त्यांच्याकडून ४ लाख १० हजार रुपये बँक ट्रान्सफर करून घेतेले. परंतु, आरोपी याने सिटीस्कॅन मशीन फिर्यादी यांना दिली नाही. फिर्यादी यांनी आरोपीकडे वारंवार पैशाची मागणी केली असता अद्यापपर्यंत सिटीस्कॅन मशीन व पैसे दिले नाहीत. यांतील आरोपी याने फिर्यादीची फसवणूक केली. या गुन्ह्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. २२/ २०२४ भादंवि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!