• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धोकादायक इमारतीमधील छताचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी

ByEditor

Feb 16, 2024

मिलिंद माने
महाड :
महाडमधील तिरुपती गृहनिर्माण सोसायटीमध्ये धोकादायक असलेल्या ए विंग मधील एका मजल्यावरील छताचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली असून या जखमी महिलेवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाडमधील काकर तळे येथील तिरुपती सहकारी गृहनिर्माण इमारत ही धोकादायक स्थितीत असल्याचे नगरपालिकेने कळवून देखील या इमारतीमध्ये आजही अनेक कुटुंब वास्तव्य करीत आहेत. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील अब्दुल राऊफ अब्दुल रज्जाक दुस्ते यांच्या घरातील छताचे प्लास्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी बद्रेजहाँ अब्दुल रऊफ दुस्ते (वय ५०) या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना महाडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. महाडमधील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उभा राहण्याची शक्यता आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!