• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी ठोकले ऐसावत कंपनीला टाळे

ByEditor

Feb 16, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
दिघोडे ग्रामपंचायतकडून ऐसावत (फास्टलेन डिस्ट्रीक पार्क अँड लाँजिस्टीक दिघोडे) या कंपनीला वारंवार नोटीसा बजावूनही सदर कंपनीने २०१४-१५ ते आजतागायत पर्यंतच्या थकीत असलेला १ कोटी ७१ लाख १२ हजार ५०६ रक्कमेचा भरणा दिघोडे ग्रामपंचायत कार्यालयाकडे जमा न केल्याने उरण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समिर वाठारकर व उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनोद मिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिघोडे ग्रामपंचायतीने कारवाईचा बडगा शुक्रवारी (दि. १६) उगारला असून दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी कंपनीला टाळे ठोकले आहे.

दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच किर्तिनिधी ठाकूर, उपसरपंच अभिजित वसंत पाटील, सदस्य अलंकार मनोहर कोळी, कैलास अंबाजी म्हात्रे, संदेश दयानंद पाटील, आरती शक्ती कोळी, रेखा नरहरी कोळी, अपेक्षा राकेश कासकर, उज्वला अनंत म्हात्रे, अपेक्षा अतिश पाटील, ग्रामसेविका मत्स्यगंधा पाटील यांनी ऐसावत (फास्टलेन डिस्ट्रीक पार्क अँड लाँजिस्टीक दिघोडे) या कंपनीचे व्यवस्थापक विशाल अशोक चिले, इंजिनिअर तथा साईट इन्चार्ज अजय प्रतापचंद्र कपूर, कर्मचारी अमोल ज्ञानेश्वर कोळी, ग्रामस्थ नरहरी हरिश्चंद्र कोळी यांच्या उपस्थितीत टाळे ठोकले आहे. दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे इतर कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!