• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठण्यात मनसेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप

ByEditor

Jun 27, 2023

माथाडी कामगार सेनेने घेतला पुढाकार

किरण लाड
नागोठणे
: येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले.

नागोठणे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेनेच्या वतीने घेण्यात आला. सदर शैक्षणिक कार्यक्रम नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे विभाग अध्यक्ष नरेश भंडारी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. या स्तुत्य कार्यक्रमात मुलांना वह्या, पुस्तके, पेन, कंपास आदी शालोपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक कार्यक्रमासाठी रोहा तालुका मनसेचे सचिव साईनाथ धुळे, रोहा तालुका महिला अध्यक्ष दिपश्री घासे, दक्षिण रायगड रोजगार शाखेचे संघटक प्रल्हाद पारंगे, मराठी उद्योजक प्रभाकर तांडेल तसेच स्वरा भंडारी, शीतल कदम, कोंडु कोकरे, यतीश घरत आदी मनसैनिक आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना बैकर आणि वर्गशिक्षिका विद्या सावंत उपस्थित होत्या. या शैक्षणिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेश भंडारी व प्रास्ताविक प्रल्हाद पारंगे यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!