• Sun. Jun 29th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली

ByEditor

Jun 27, 2023

दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर; ताम्हिणी घाटाचा अवलंब करण्याचा सूचना

देवेंद्र दरेकर
पोलादपूर :
पोलादपूर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पाऊस पडताच तालुक्यामध्ये ठीकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

वाहतुकीसाठी मुख्य मानल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये आज मंगळवारी रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची घटना घडली असून रस्त्यावर मोठमोठ्या दगडी व मातीचा ओसरा आला असल्याने दोनही बाजूने रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे दोनही बाजूची वाहतूक बंद करण्यात आले असून रेस्क्यू टीम व प्रशासनाच्या मदतीने दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान प्रवाशांनी ताम्हिणी घाट मार्गे प्रवास करण्याच्या सूचना रायगड पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!