• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विना परवाना रेड्यांच्या झोब्यांचे आयोजन केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

ByEditor

Mar 5, 2024

मिलिंद माने
महाड :
तालुक्यातील घुरुपकोंड गावातील मोकळ्या शेतात रविवारी (दि. ३) रोजी सकाळी ९:२० वाजण्याच्या दरम्यान बेकायदेशीर रेड्यांच्या झुंजीचे आयोजन केल्या प्रकरणी दोन आरोपींवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक विक्रम धोत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाड तालुक्यातील घुरुपकोंड येथे रविवारी सकाळी ९:२० वाजण्याच्या सुमारास मोकळ्या शेतात कायद्याने बंदी असताना बेकायदेशीररित्या रेड्यांच्या झुंजीचे आयोजन करून त्यासाठी विना परवाना जागा वापरून जिल्हाधिकारी यांच्याकडील जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तसेच सीआरपीसी कलम १४९चे नोटीसीचा भंग केल्याने सुनील विलास कोर्पे (वय ४२ रा.नेराव), नामदेव भाऊ गोलांबडे (वय – ६५ रा. घुरुपकोंड) या दोघांविरोधात भादवी कलम १८८ सह प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(एन), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काजरोलकर हे करत आहेत.

महाड व पोलादपूर तालुक्यात रेड्यांच्या झोंब्या आयोजित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असताना देखील बेकायदेशीर व अनधिकृतरित्या कायदा धाब्यावर बसवून पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर रेड्यांच्या अनधिकृत झोंब्या आयोजित करण्यामागे राजकीय वरदहस्त असल्यामुळेच अशा अनधिकृत रेड्यांच्या झोंब्या होत असल्याचे यातून सिद्ध होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!