मुंबई: जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याचे वृत्त हाती आले आहे. अनेक युझर्सचे फेसबूक अकाऊंट आपोआप लॉगआऊट होत असल्याची तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारीनंतर आता जगभरात फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याची चर्चा रंगली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन नेमकं का डाऊन झालं, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
जगभरातील फेसुबक, इन्टाग्राम युजरचे अकाऊंट आपोआप लॉगआऊट होत आहेत. फेसबुक आणि इन्टाग्राम अकाऊंट अचानक लॉगआऊट झाल्याने युजर्सचा गोंधळ उडाला आहे. फेसबुक सुरु केल्यानंतर युजर्संना मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड मेसेज आला. त्यानंतर फेसबुक अकाऊंट लॉगआऊट झाले आहे.
फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पासवर्ड नाकरला जात आहेत. तुम्ही फेसबुकच्या होम पेजवर गेल्यावर फेसबुक तुम्हाला आपोआप बाहेर काढत आहे. फेसबुक पुन्हा एकदा लॉगइन करण्याता प्रयत्न केला तर एरर मेसेज येत आहे. त्यानंतर पुन्हा प्रयत्न केल्यानंतर तुमची क्रेडेन्शियल्स नाकारली जात आहे.
दुसरीकडे इन्स्टाग्रामवरही त्याचप्रकारचा मेसेज येत आहे. त्यामुळे पासवर्ड बदलण्याची गरज नाही. कारण जगभरातील इन्स्टाग्राम आणि फेसबुक सेवा विस्कळीत झाली आहे. याबाबत लवकरच फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडून अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.