• Mon. Jun 30th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पोयनाड बाजारपेठेतील मोबाईल शॉपमध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस २४ तासात अटक

ByEditor

Mar 23, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
तालुक्यातील पोयनाड बाजारपेठेत असणाऱ्या ए-1 मोबाईल शॉप दुकानामध्ये लाखों रुपये किमतीच्या मोबाईलच्या हँडसेटसहित रोख रक्कमेची चोरी करून फरार झालेला आरोपी बाबू हनुमानजी चौधरी (रा. शिरपुरा, पो. कनसारी, ता. डिसा, जि. बनासकाटा, गुजरात) यास पोयनाड पोलिसांनी शिताफीने २४ तासात दादर रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबाग तालक्यातील पोयनाड बाजारपेठेत असणारे ए-1 मोबाईल शॉपमध्ये बाबू हनुमानजी चौधरी याने दुकानाचे कुलुप उघडुन आत प्रवेश करून तीन लाख ३२ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच सूरज सेन व घेवाराम माळी यांचे वापरते मोबाईल फोन चोरून नेले होते. याबाबत राजू माळी यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. या चोरीचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे आणि त्यांच्या पथकाने जलदगतीने करीत आरोपी याची माहिती घेत तो चोरी करून त्यांच्या गावी जाणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळवली. गावी जाण्यासाठी दादर गर्दीचे ठिकाण असून मुंबई रेल्वे स्टेशन येथून सुटणारी ट्रेन ही दादर येथे फक्त काही मिनिटच थांबत असल्याने आरोपीस वाटले की त्याला दादर रेल्वे स्टेशन येथे असणाऱ्या गर्दीमध्ये कोणीही ओळखणार नाही असा समज करून आरोपी दादर रेल्वे स्टेशन येथे ट्रेन पकडण्यासाठी गेला होता. मात्र कानुन के हाथ लंबे होते है वाक्य सत्यात उतरवत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांनी दादर रेल्वे स्टेशन लोहमार्ग पोलीस यांच्या मदतीने त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे.

पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे आणि त्यांच्या पथकाने जलदगतीने चक्र फिरिवित आरोपीस ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!