अमुलकुमार जैन
अलिबाग : तालुक्यात अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यासोबत आरोपीच्या घरी शाररिक संबंध प्रस्थापित केल्याबद्दल अल्पवयीन मुलीच्या आईने अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अलिबाग तालुक्यातील अलिबाग-पेण रस्त्यावर असणाऱ्या गावातील आरोपी याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी हि तेरा वर्ष चार महिने आहे हे माहीत असताना देखील त्याने तिचे पालकांचे संमतीशिवाय लग्न करण्यासाठी फुस लावुन तिस तिचे राहते घरातुन पळवून नेले आणि आपल्या घरात वारंवार शरीर संबध प्रस्तापित केले.
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 67/2024 भा.दं.वि 363,366,376,376(2)(N), 367(3) पोस्को अंतर्गत 4,8,12 प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उप निरीक्षक शेलार या करीत आहेत.