मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 16 मतदारसंघांमधील उमेदवार उद्धव ठाकरे गटाने जाहीर केले आहेत.
बुलढाणा– नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ- संजोग वाघेरे पाटील
सांगली- चंद्रहार पाटील
हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
धाराशीव- ओमराजे निंबाळकर
शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
नाशिक- राजाभाऊ वाजे
रायगड- अनंत गिते
सिंधुदुर्ग, रत्नागिरी- विनायक राऊत
ठाणे- राजन विचारे
मुंबई, ईशान्य- संजय दिना पाटील
मुंबई, दक्षिण- अरविंद सावंत
मुंबई, वायव्य- अमोल कीर्तिकर
परभणी- संजय जाधव

17 वं नाव राऊतांनी केलं जाहीर
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीसहीत ठाकरे गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीतील 16 उमेदवारांसहीत संजय राऊतांनी 17 वं नाव सोशल मीडियावरुन जाहीर केलं आहे. यादीमध्ये 16 नावं असली तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावरुन दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.’ एकूण 17 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
कल्याणमधून नावाची घोषणा नाही
मुख्यमंत्र्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंविरोधात एकनाथ शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंच्या नावाची घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्या यादीत कल्याण मतदारसंघाचा समावेश नसल्याने केदार दिघे नाराज असल्याचं बोललं जात आहे.