• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मिरज-बोर्ली-श्रीवर्धन बसला अपघात; तांत्रिक बिघाडामुळे बस कलंडली

ByEditor

Apr 9, 2024

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, 34 प्रवासी किरकोळ जखमी

अभय पाटील
बोर्ली पंचतन :
मिरजहुन बोर्ली पंचतन मार्गे श्रीवर्धनला जाणारी एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 3171 बोर्ली पंचतन जवळील वडवली फाटा येथे आली असता प्राथमिक अंदाजानुसार बसचे पुढील भागातील स्प्रिंग तुटल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दुसऱ्या बाजूला जाऊन 10 फूट खाली पलटी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. यावेळी बसमध्ये 34 प्रवासी प्रवास करीत होते. सर्व प्रवासी किरकोळ जखमी असल्याने त्यांना उपचारासाठी बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!