• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे येथे चाळीस गाव वारकरी संप्रदायाच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन

ByEditor

Apr 9, 2024

किरण लाड
नागोठणे :
जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्ति वांनू, अवतार तुम्हां धराया कारण, उध्दराया जन जड जीवा, तुम्ही संत मायबाप…या जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या अंभगवाणीप्रमाणे चाळीसगाव वारकरी संप्रदाय नागोठणे विभागाच्यावतीने नागोठणे येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री संत ज्ञानेश्वर मंदिर नागोठणे येथील माता जोगेश्वरी प्रागंणात चैत्र शुक्ल, बुधवार, दि.10 एप्रिल ते गुरुवार, दि.11 एप्रिल 2024 रोजी कीर्तन महोत्सवाचे आयोजन नागोठणे विभाग चाळीस गांव वारकरी संप्रदायाच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील अध्याय नववा व बाराव्याचे पारायण होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या अखंड हरिनामाच्या वेळी प्रसिद्ध कीर्तनकारांचे कीर्तन माता जोगेश्वरी प्रागंणात रंगणार आहेत.

बुधवार दि.10 एप्रिल रोजी सायंकाळी 7 ते 9 वाजता झी टॉकीज फेम, प्रसिद्ध कीर्तनकार, कीर्तन केसरी हभप गहिनीनाथ महाराज खेडकर, पारगाव, जि. बिड यांचे कीर्तन होणार आहे. तर गुरुवार, दि.11 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार हभप डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्रीजी, आळंदी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. नागोठणे विभागातील वारकरी संप्रदायांचे सामुदायिक हरिपाठ सायंकाळी 5 वाजता होणार आहे. या कीर्तनरुपी महोत्सवाचा आनंद सर्व वारकरी, ग्रामस्थ, बंधू-भगिनींनी घ्यावा असे आवाहन चाळीसगाव वारकरी संप्रदाय नागोठणे विभाग यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!