मिलिंद माने
महाड : शहराजवळील किंजळघर येथे एक तरुण धारदार शस्त्र हातात घेऊन गावात दहशत वाजवण्याच्या उद्देशाने फिरत असताना महाड शहर पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन त्याच्यावर कारवाई केली आहे.
मंगळवार, दि. 10 एप्रिल रोजी किंजळघर गावात भाड्याने राहणारा परप्रांतीय तरुण नरसिंह हनुमंत पवार (मूळ राहणार कुमटक्की, कर्नाटक) याने धारदार सुरा हातात घेऊन दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावात फिरत असताना राजेश पांडुरंग सुतार यांनी महाड शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावेळी तो गावातील लोकांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याची धमकी देत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर भादवि कलम ५०४/५०६ अन्वये कारवाई केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे हे करत आहेत.