• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अंगात सैतान येतो म्हणत आईनं १८ महिन्याच्या मुलीची स्मशानात नेऊन केली हत्या; मुंब्रा येथील घटना

ByEditor

Apr 11, 2024

वृत्तसंस्था
ठाणे :
ठाण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा परिसरात अंधश्रद्धेतून एका आईने पोटच्या १८ महिन्यांच्या मुलीचा बळी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या अंगात सैतानाचा वास असल्याचे म्हणत तिच्या आई-वडिलांनी तिला स्मशानात घेऊन संपवलं. या प्रकरणी पोलिसांनी चिमुकलीच्या आई-वडिलांना अटक केली आहे. या प्रकाराने मुंब्रा हादरलं आहे. पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, ⁠ठाण्याजवळील मुंब्रा येथे आईने पोटच्या बाळाची हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अघोरी कृत्यासाठी आईवडिलांनी आपल्या १८ महिन्यांच्या मुलीचा स्मशानात नेऊन हत्या केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी अघोरी कृत्य करत होते. बाळाच्या ⁠अंगात सैतानाचा वास असल्याचे म्हणत आईने आपल्या १८ महिन्यांच्या बाळाला स्माशानभूमीत नेले. तेथे काही मंत्र-तंत्र म्हणत निर्दयीपणे १८ महिन्याच्या बाळाची हत्या केली. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

निनावी पत्रामुळे प्रकार उघडकीस –
१८ महिन्याच्या बाळाची हत्या केल्याचा हा सगळा प्रकार एका निनावी पत्रामुळे उघड झाला आहे. पोलिसांना एक निनावी पत्र सापडलं होतं. या पत्राच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हा चक्रावणारा सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपी आई-वडिलांना ताब्यात घेतलं.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!