• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य वाटप

ByEditor

Jul 1, 2023

किरण लाड
नागोठणे :
येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत, शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्याकडुन छोटीशी मदत या हेतुने नागोठणे येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या सामाजिक कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेवसिंग परदेशी, मुकुंद मोदगी, दिलिप शहासणे, उल्हास मोरे, भाऊ मोरे, चंद्रकांत कामथे, दत्ताराम कडव, मारुती तटकरे हे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना बैकर, वर्गशिक्षिका विद्या सावंत व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!