दीपक मयेकर यांच्या तक्रारीवरून केली कारवाई
संतोष रांजणकर
मुरूड : शहरातील कोळीवाडा येथील नंदकुमार मकू यांनी आपल्या घराच्या बाजुच्या शासकीय जागेवर मातीचा भराव करुन झाडे व पाण्याचा पंप लावुन आपल्या सोयीनुसार जागेचा वापर करीत होते. त्यामुळे दिपक मयेकर यांना त्या जागेवरून आपल्या घरात जाण्याकरिता अडथळा येत होता. तसेच रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना ही यांचा अडथळा होत होता. या संदर्भात दिपक मयेकर यांनी मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना रितसर तक्रार अर्ज केला होता. त्या अर्जावर नगरपरिषदेने दखल घेऊन नगरपरिषदेचे बांधकाम अधिकारी, स्वच्छता विभाग अधिकारी व कर्मचारी येऊन त्या बांधकाम वर हातोडा मारुन जागा मोकळी करण्यात आली.
बांधकाम तोडते वेळी नगरपरिषदेने पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी दिपक मयेकर यांनी नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी-पंकज भुसे व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.