हरेश मोरे
साई-माणगाव : माणगाव तालुक्यातील साई प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई पदावर कार्यरत असलेले दत्ताराम भिकू मोरबेकर हे 30 जून रोजी सेवेतून निवृत्त झाले. त्यावेळी साई प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद यांनी मोरबेकर यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित केला होता.

दत्ताराम मोरबेकर यांनी आरोग्य विभागात 38 वर्ष नोकरी केली असून ते साई पंचक्रोशीतील जनतेजवळ मनमिळाऊ स्वभावाने रहात असत. रुग्णांची सेवा करताना, ड्रेसिंग करताना सतत हसतमुख असणारे सर्वाना हवेसे वाटणारे मामा मोरबेकर सेवानिवृत्त झाले. या कार्यक्रमासाठी त्यांच्या पत्नी लता मोरबेकर आवर्जून उपस्थित होत्या. तसेच साई प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भालके, डॉ. प्रियांका वाढवल, कर्मचारी जयवंत शिंदे, विलास चव्हाण, सौ. मंचेकर, सौ. राऊत, सौ. रणखांबे, सौ. मोरे, सौ. माळकरी, सौ. प्रतिभा खंकर, प्रतीक पाटील, हरेश चव्हाण, अकेश तसेच साई पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते गजानन अधिकारी, गफ्फार रहाटविलकर, गणेश पवार, जग्गनाथ लाड, भिवाजी कठे यांची प्रमुख उपस्थिती होती.