नंदकुमार मरवडे
खांब : रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात सर्पमित्र म्हणून नावारूपाला आलेल्या दिपक कोल्हटकर याने सुमारे दहा फुटी लांब अजगरास जीवदान दिले.
तालुक्यातील धामणसई या गावामध्ये एका घरात साप दडून बसला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश मालुसरे यांनी सर्पमित्र योगेश कोल्हटकर यांना फोनवरून दिली. सर्पमित्र योगेश कोल्हटकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित ठिकाणाची माहिती घेऊन साप जिथे दडून बसला होता तिथे सापाला शोधण्याचे प्रयत्न सुरू केले असता सापाच्या हालचालीवरून दडून बसलेला साप हा अजगर जातीचा असल्याने सर्पमित्र योगेश कोल्हटकर यांनी उपस्थितांना सांगितले. त्यामुळे सा-यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. तर सर्पमित्र योगेश कोल्हटकर यांनी मोठ्या शिताफीने व कौशल्याने अजगरास पकडून जीवदान दिले. तर सर्पमित्र योगेश कोल्हटकर यांच्या या कामी वनाधिकारी विकास राजपूत व प्रथमेश राक्षीकर, निलेश म्हात्रे, दिपक कोल्हटकर, अमेय कराळे, आदित्य नागे आदींच्या सहकार्याने अजगर सापास जंगलभागात सुरक्षितरित्या सोडून दिले.त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.