• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई; उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश

ByEditor

May 27, 2024

वैशाली कडू
उरण :
उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. त्या मागणीला यश आले असून अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज उतरविण्यात आले आहेत.

उरण तालुक्यात सिडको द्रोणगिरी व उरण पनवेल महामार्गावर रस्त्याच्या कडेला शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंग्जचे साम्राज्य उभे राहिले आहे. शासकीय यंत्रणेचे अर्थपूर्ण हीतसबंध असल्याने जाहिरात एजन्सी चालविणार्‍यांवर कारवाई होत नाही. काही दिवसापूर्वी मुंबई घाटकोपर येथे झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा बळी गेला तर कित्येकजण जखमी झाले आहेत. या होर्डिंग्जमुळे दुर्घटना घडण्याच्या शक्यतेत वाढ होत आहे. उरण तालुक्यातही अशाप्रकारे अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्ज लावण्यात आले होते. मात्र, या अनधिकृत होर्डिंग्जवर ठोस कारवाई करण्यात येत नाही. अशाप्रकारे लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्जवर त्वरित कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. या मागणीला यश आले असून काही ठिकाणचे होर्डिंग्ज उतरविण्यात आले आहे.

उरण ते जेएनपीटी वसाहत स्ंकुलापर्यंतच्या मार्गावरील होर्डिंग्ज उतरविण्यात आले असले तरी होर्डिंग्ज उतरविणाऱ्या कामगारांनी कोणत्या अधिकार्‍याच्या सांगण्यावरून वीर वाजेकर विद्यालयाच्या समोरील नवघर उड्डाणपुला जवळील होर्डिंग्ज अजूनही जाहिरातीसह जाणीवपूर्वक जपून ठेवला आहे. याची चर्चा आता नाक्यानाक्यावर सुरू आहे.

सोमवार दि. 13 मे 2024 रोजी घाटकोपर छेडा नगर परिसरातील 120×120 फुटाचं होर्डिंग कोसळल्याने तब्बल 14 जणांचा हकनाक जीव गेला होता. यापूर्वी दि. 18 एप्रिल 2020 रोजी पिंपरी चिंचवड रावेत परिसरात होर्डिंग पडून निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. उरण-पनवेल मार्गावर लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंगने सुद्धा 2 ते 3 वर्षापूर्वी नवीन शेवा गावाजवळ 1, बोकडविरा चारफाटा येथे 2 तर वायु विद्युत केंद्र वसाहत स्ंकुला समोर 1 आदि ठिकाणी लावण्यात असलेल्या होर्डिंगने सुद्धा या मार्गावर वादळी हवामानात भर पावसाळ्यात लोटांगण घातले होते. यामध्ये जरी मोठी दुर्घटना घडली नसली तरी होर्डिंग्जच्या बांधकामचा दर्जा नित्कृष्ट असल्याचे उघड झाले होते.

आजही उरण द्रोणगिरी शहर परिसर उरण पनवेल मार्गावर अशा प्रकारचे होर्डिंग्ज उभे आहेत. या होर्डिंग्जपैकी अनेक होर्डिंग्ज अनधिकृत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने वेळोवेळी केली होती. याची दखल घेत सिडको प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खात्याने घेत व घाटकोपर छेडा नगर परिसरातील 120×120 फुटाचं होर्डिंग मुळे झालेली दुर्घटना याची दखल घेत शासनाने काढलेल्या आदेशानुसार उरण पनवेल महामार्गावरील लावण्यात आलेल्या मोठमोठया होर्डिंगवरील जाहिरातीचे बॅनर उतरविण्यात आले आहेत. लोखंडी अँगलचे स्ट्रक्चर मात्र अजूनही उभेच आहेत. अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण सहकार्यामुळे होर्डिंग्ज उतरविणाऱ्या कामगारांनी कोणत्या अधिकार्‍याच्या सांगण्यावरून वीर वाजेकर विद्यालयासमोरील नवघर उड्डाणपुला जवळील होर्डिंग्ज अजूनही जाहिरातीसह जाणीवपूर्वक कारवाई न करता उभा ठेवला आहे याची चर्चा आता नाक्या नाक्यावर सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!