• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पंचायत समिती कर्मचारी चंद्रशेखर पाटील यांचे अपघाती निधन

ByEditor

May 30, 2024

घन:श्याम कडू
उरण :
सर्वांशी हसत खेळत असणारे पंचायत समितीचे कर्मचारी, सारडे गावचे चंद्रशेखर हिराचंद पाटील उर्फ राकाशेठ (वय ४९) यांचे दि. २६ मे २०२४ रोजी दुचाकीवरून प्रवास करीत असताना पिरकोन गावच्या वळणावर अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, भाऊ आणि आई असा परिवार आहे. नुकतीच त्यांची उरण पंचायत समिती येथून पनवेल पंचायत समितीमध्ये बदली झाली होती. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषद सेवेत प्रामाणिकपणे काम करत असताना चंद्रशेखर पाटील यांना सामाजिक कार्याची आवड होती आणि याच सामाजिक कार्यामुळे त्यांची पत्नी सारडे ग्रामपंचायत सदस्य पदावर तर आई सरपंच पदावर निवडून आली होती. दि. २६ मे २०२४ रोजी सायंकाळी सारडे येथील राहत्या घरुन स्वतःच्या दुचाकीने कोप्रोली येथे काही कामानिमित्त जात असताना पिरकोन येथील रस्त्याच्या वळणावर गाडीचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल शेतात जाऊन ते खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला झालेल्या मोठ्या दुखापतीमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल सारडे गावासह परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. चंद्रशेखर पाटील हे ज्या ज्या कार्यालयात कार्यरत होते तेथील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!